ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केला दुचाकी चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश

ठाणे गुन्हे शाखा घटक क्रमांक ४ च्या पोलीसांनी दुचाकी चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. उल्हासनगर परिमंडळातील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर परिसरात दुचाकी चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली होती. याबाबत गुन्हे शाखा घटक क्रमांक ४ कडून समांतर तपास सुरू होता. गुन्हे शाखेचे पोलीस नाईक जगदिश कुलकर्णी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नेहमी मोटरसायकल चोरी होण्याच्या ठिकाणी त्यांनी सापळा लावला होता. त्यावेळी त्यांना धनंजय कुमावत आणि एक अल्पवयीन संशयास्पद हालचाली करताना मिळाले. त्यांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी इतर ३ अल्पवयीन सहका-यांच्या मदतीने उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण या परिसरात चोरी करत असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सव्वासहा लाखांच्या २५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. यामध्ये १५ ॲक्टीव्हा स्कूटर आणि १० मोटर सायकल आहेत. या टोळीला पकडल्यामुळे दुचाकी चोरीचे २१ गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

Leave a Comment

%d bloggers like this: