ठाणे आणि पालघर कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय वन पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. सागरी किना-याजवळ असणा-या ५ जिल्ह्यांपैकी मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनची परवानगी मिळाली आहे. पण ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना अद्याप अशी परवानगी मिळालेली नाही. यामुळं या जिल्ह्यातील विकासकामांवर परिणाम होत आहे. खासदार राजन विचारे यांनी वन पर्यावरण विभागाचे सहसचिव रितेशकुमार आणि इतर अधिका-यांची भेट घेऊन कोस्टल झोन मॅनेजमेंटसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली. लवकरच याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
