ठाकरे नंतर आता आनंद दिघे यांच्यावरही येणार चित्रपट

ठाकरे चित्रपटानंतर आता शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर हा मराठी चित्रपट येणार आहे. आनंद दिघे यांची जयंती अलिकडेच साजरी करण्यात आली. त्यावेळी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आनंद दिघे यांच्यावर मराठी चित्रपट काढण्याची घोषणा केली. जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात शिवसेना तळागाळापर्यंत पोहचवण्याचं काम आनंद दिघे यांनी केलं. शिवसेना घराघरात पोहचवण्याचं श्रेय आनंद दिघे यांना आहे. आजच्या तरूण पिढीला आनंद दिघे यांचं सामाजिक योगदान कळावं म्हणून त्यांच्यावर चित्रपट बनवण्याचा मानस त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी व्यक्त केला आहे. केदार दिघे आनंद दिघे डॉट कॉम या नावानं संकेतस्थळ तयार करत असून या संकेतस्थळावर आनंद दिघे यांच्याविषयी इत्तंभूत माहिती देण्याचा प्रयत्न असल्याचं केदार दिघे यांनी सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: