टोईंगच्या नावाखाली बनावट पावत्या फाडणा-या टोळीला मनसैनिकांकडून चोप

टोईंगच्या नावाखाली बनावट पावत्या फाडणा-या टोळीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी आज पहाटे चोप दिला. गेले अनेक दिवस आनंदनगर जकात नाक्याजवळ रात्री २ च्या सुमारास राज्याबाहेरील गाड्या अडवून एक टोळी जबरदस्तीने बनावट पावत्या फाडण्याचं काम करत होती. लाठ्याकाठ्यांचा धाक दाखवून या टोळीकडून असा प्रकार सुरू होता. याप्रकारच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर आज पहाटेच्या सुमारास उपस्थित वाहतूक पोलीसांना या प्रकाराबद्दल त्यांनी जाब विचारला. त्यावेळी वाहतूक पोलीसांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. तर टोईंग टोळीनं दादागिरीची भाषा सुरू केली. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी या टोळीतील मंडळींना बेदम चोप दिला.

Leave a Comment