झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या विकासकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या विकासकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खोपट परिसरातील गोकुळदास झोपू योजनेतील विक्रीसाठी निर्माण केल्या जाणा-या इमारतीतील सदनिकेसाठी आगाऊ रक्कम भरूनही सदनिका आणि भरलेली रक्कमही मिळाली नाही यामुळं तब्बल ७ वर्ष वाट पाहल्यानंतर ठाकरसी शहा या ग्राहकानं राबोडी पोलीस ठाण्यात कामधेनु डेव्हलपर्सच्या ललित पारेख आणि त्यांचे भागीदार कमलेश जिवावत यांच्याविरोधात लाखो रूपयांच्या रक्कमेचा अपाहार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खोपट येथील गोकुळदासवाडी या झोपडपट्टीची गोकुळदास को-ऑपरेटिव्ह सोसायटी असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्वसनासाठी २०१० मध्ये झोपड्या तोडण्यात आल्या. कामधेनु डेव्हलपर्स मार्फत विक्री करण्यासाठी किंगस्टन एन्क्लेव्ह हा गृहप्रकल्पही उभारण्यात येणार होता. ठाण्यातील टेंभीनाका येथील व्यावसायिका ठाकरसी प्रेमजी शहा यांच्यासह नितीन मांजरेकर आणि चेतन निगडे आदींनी ५० लाखांची रक्कम कामधेनु डेव्हलपर्सकडे २०१२ मध्ये जमा केली होती. रक्कम मिळाल्यानंतर विकासकानं ॲलॉटमेंट लेटर देऊन ७ वर्ष उलटली तरी सदनिका अथवा रक्कम न मिळाल्यानं शहा यांनी याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: