ज्येष्ठ शिक्षिका लीलाबाई श्रोत्री यांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने त्यांचा सन्मान

तब्बल ७० वर्ष कोणत्याही फळाची अपेक्षा न करता विद्यार्थ्यांना संस्कृतचे मार्गदर्शन करणाऱ्या नव्वदीपार झालेल्या ज्येष्ठ शिक्षिका लीलाबाई
श्रोत्री यांच्या कार्याची दाखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. ज्ञान ही अशी एक गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिली की वाढते, या तत्त्वावर अढळ श्रद्धा असणाऱ्या लीलाबाई श्रोत्री या वयाची नव्वदीपार झालेल्या ज्येष्ठ शिक्षिका अजूनही चरई विभागातील त्यांच्या घरी विद्यार्थ्यांना संस्कृतचे मार्गदर्शन करीत आहेत. आठवी ते दहावीचे विद्यार्थी खास संस्कृत शिकण्यासाठी त्यांच्याकडे दररोज संध्याकाळी येतात. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल ७१ वर्षे त्यांचा हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू आहे. त्यांच्या या भरीव कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ठाणे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांनी शिक्षिका लीलाबाई श्रोत्री यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सरस्वतीची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. ठाण्यातील समर्थ विद्यालयात २२ वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या लीलाबाई त्यानंतर आता ३० वर्षांहून अधिक काळ घरी शिकवणी वर्ग घेत आहेत. संस्कृत विषय शिकविण्यात श्रोत्रीबाई अतिशय पारंगत आहेत. आर्थिकदृष्टय़ा गरीब घरातील मुलांना चांगले मार्गदर्शन करता यावे, हा त्यांच्या शिकवण्यामागचा हेतू. आहे मुळात त्यांच्या शिकवणी वर्गाचे शुल्क अगदी माफक. त्यातही गरीब मुलांकडून पैसे घ्यायचे नाहीत, उलट स्वत: अथवा परिचितांकडून देणग्या मिळवून त्यांना शिक्षणासाठी मदत करायची, हे श्रोत्रीबाईंचे तत्त्व आहे त्यामुळे वयाची नव्वदी पार केली असताना हि आपले हे कार्य श्रोत्रीबाईं निष्टेने करत असल्याने त्याच्या या कार्याला सलाम म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदरचा सन्मान करण्यात आल्याचे मनसेचे विद्यार्थी सेने ठाणे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांनी सांगितले.

Leave a Comment

%d bloggers like this: