ज्येष्ठांच्या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी केली ५३ पदकांची लयलूट

महाराष्ट्र स्टेट वेट्रन्स ॲक्वाटीक असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी ५३ पदकांची लयलूट केली आहे.गोंदिया येथे झालेल्या २५ वर्षांवरील स्पर्धकांच्या या स्पर्धेत २६ जिल्ह्यातील ३०० खेळाडू सहभागी झाले होते. जिल्ह्यातून २० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी २१ सुवर्ण, १५ रौप्य आणि १७ कांस्य पदकं अशी एकूण ५३ पदकं पटकावत ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जिल्ह्यातील टी आर जोशी, ज्ञानेश्वर सावंत, अजित मर्दे, स्वप्नाली फिरके, अनिल कांबळे, नरेंद्र पवार, सोमा गावडे, प्रकाश शिंदे, एल. आर. मुळीक, शंबित आणि सोमा भट्टाचार्य, स्वप्ना वाणी, पी. व्ही. कामत, ए. पी. शर्मा, देबर्धो भट्टाचार्य, हेमांगी गावडे, डॉ. गायकवाड, एस. एस. पत्की, एम. आर. प्रजापती, एस. आर. शेट्टी हे स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी वैयक्तीक, सांघिक विजेतेपद पटकावत पदकांची लयलूट केली. या सर्व स्पर्धकांना नरेंद्र पवार, अजित मर्दे आणि सोमा गावडे या महापालिकेच्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं होतं. आठवड्यातून २ वेळा एक तास महापालिकेचा कळवा तरण तलाव उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या स्पर्धकांनी केली आहे.

Leave a Comment