थीम पार्क प्रमाणे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील सौरउर्जा प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. कळव्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयातील सौर उर्जेचा प्रकल्प १३ फेब्रुवारी २००९ मध्ये शारदा एन्टरप्रायझेसला देण्यात आला होता. जवळपास ४ कोटीचं हे काम होतं. या कामाचा अवधी ६ महिने होता. काम वेळेत पूर्ण न झाल्यास रोज १० हजार रूपयांच्या दंडाची अट होती. पण आज १० वर्षानंतरही हे काम पूर्ण झालेलं नाही. यापोटी जवळपास २ कोटीचा दंड झाला असला तरी या कंपनीला १ कोटी ७७ लाख रूपये देण्यात आले. अद्यापही काम पूर्ण झालं नसताना या कंपनीला कसे पैसे देण्यात आले याची चौकशी करावी अशी मागणी संजीव दत्ता यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
