खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं खुंटवली येथे लावण्यात आलेल्या झाडांना आग – सीबीआय चौकशी करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी

कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं लावण्यात आलेल्या अंबरनाथ मधील खुंटवली येथील वृक्षांना आगी लावण्याचा प्रकार घडला आहे. गेल्या आठवड्यात १५ नोव्हेंबर रोजी अंबरनाथमधील मांगरूळ येथे लावण्यात आलेल्या झाडांना आगी लागण्याचे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा ही घटना घडली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत आग लागण्याच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे करावी अशी मागणी एका पत्रकार परिषदेत केली आहे. मांगरूळ येथे लावण्यात आलेल्या झाडांना गेल्या वर्षभरात दोन वेळा आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. खुंटवली येथे घडलेल्या घटनेवरून वन विभाग आणि भूमाफिया संगनमतानं काम करत असून सर्व वनं नष्ट व्हावीत असा श्रीकांत शिंदे यांचा आरोप आहे. या आगी जाणूनबुजून लावल्या जात असून वन विभाग यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचं शिंदे यांचं म्हणणं आहे. आत्तापर्यंत लावण्यात आलेल्या झाडांचे थर्ड पार्टी ऑडीट करावे, उप वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा काही मागण्या श्रीकांत शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत केल्या.

 

Leave a Comment