खासदार राजन विचारे यांच्यामुळे स्वत:च्या पायावर चालू शकली रूनाली मोरे

खासदार राजन विचारे यांच्यामुळे रूनाली मोरे स्वत:च्या पायावर चालू शकली आहे. घोडबंदर येथे राहणारी रूनाली मोरे ही आपले आई, वडील आणि एका भावासह घोडबंदर येथे राहत होती. वडील अंध असल्यामुळं घरची जबाबदारी सर्व आईवरच होती. आई चार घरची धुणीभांड्याचं काम करून घर चालवत होती. रूनाली मोरे हिच्या मनात डॉक्टर होण्याची इच्छा होती. पण गणित विषय अवघड जात असल्यामुळं ती ठाणे रेल्वे स्थानक परिसरात शिकवणीच्या शोधात आली होती. आपल्या मैत्रिणीला डोंबिवलीच्या गाडीत बसवून देण्यासाठी दुपारच्या वेळेस रूनाली फलाट क्रमांक ५ वर गेली असताना ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी पाहून भांबावून गेली. याच वेळी काळानं तिच्यावर घाला घातला. घाबरलेली रूनाली समोरून येणा-या गाडीला पाहू शकली नाही आणि या धावपळीतच धक्का लागून ती रेल्वे रूळावर पडली. प्रवाशांनी त्यावेळी आक्रोश केला. पण हा आक्रोश व्यर्थ गेला कारण तिचे दोन्ही पाय रेल्वेखाली येऊन तुटले होते. रूनालीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. आधीच अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या मुलीसोबत असे घडले. पण खासदार राजन विचारे यावेळी धावून गेले आणि खासदार निधीतून २ लाख २० हजार रूपयांची तरतूद करून त्यांनी रूनाली मोरेला कृत्रिम पाय बसवून दिले. त्यामुळं आज ती ख-या अर्थानं पायावर उभी राहू शकली आहे. त्यामुळं आता तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्नही साकार होऊ शकणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading