खासदार कसा असावा या फलकानं निर्माण केली ठाण्यात उत्सुकता

ठाण्यामध्ये खासदार कसा असावा अशा आशयाचे फलक विविध ठिकाणी लागले असून हे फलक कोणी लावले याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या वातावरण निर्मितीस सुरूवात झाली असून या फलकाने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ठाण्याचा खासदार कसा असावा, उच्चशिक्षित की अल्पशिक्षित, लोकसभेत बोलणारा की लोकसभेत मौन धारण करणारा, आतातरी विचार कर ठाणेकर असा आशय या फलकावर आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेनं अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी राजन विचारे यांच्याच गळ्यात लोकसभेची माळ पडण्याची शक्यता दिसत आहे. या दोघांमध्ये जर अपेक्षित लढत झाल्यास आनंद परांजपे हे जास्त शिक्षित असल्याचं दिसत आहे. त्यामुळं या निवडणुकीत शिक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. हा फलक कोणी लावला याबाबत कोणतीच माहिती फलकावर नाही मात्र आनंद परांजपे यांची उजवी बाजू मांडणारा फलक कोणी लावला असावा हे या फलकाच्या आशयावरूनच स्पष्ट होत असल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: