खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत सोन्याचे मंगळसूत्र लांबवून पोबारा

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत आलेल्या तिघा जणांच्या कुटुंबाने दागिने पाहण्याचे नाटक करून हातोहात सोन्याचे मंगळसूत्र लांबवून पोबारा केल्याची घटना नौपाडा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोखले रोडवर कुंदन ज्वेलर्स हे सोने चांदीच्या दागिने विक्रीचे दुकान आहे. या दुकानात 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एक पुरुष आणि दोन महिला दागिने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी या तिघांनी दुकानातील सेल्समनला दागिने दाखवण्यास सांगितले. दुकानातील सेल्समन दागिने दाखवत असतांना महिलेने हातचलाखीने 60 हजार किमतीचे 19 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आपल्या मुलीकडे दिले. मुलीने ते मंगळसूत्र बँगमध्ये लपवून तिघेही पसार झाले. हा सारा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्यामुळे चोरीचा प्रकार उशिरा सराफाच्या लक्षात आला. त्यानुसार एक महिला, एक युवती आणि एक पुरुष यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: