कोरम मॉल मध्ये बिबट्याच्या वावरानं खळबळ उडाली आहे. मध्यरात्री कोरम मॉलच्या पार्किंग मध्ये बिबट्या शिरला होता. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन केन्द्र, वन विभाग, पोलीस अधिकारी या टिकाणी उपस्थित असून पहाणीच काम सुरु आहे. कोरम मॉलचे सी. सी. टीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंती वरून पहाटे साडेपांचच्या सुमारास बाहेर गेल्याचे दिसले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागा मार्फत संपूर्ण मॉलची आणी परिसराची पहाणी सुरु आहे.
