कोपरीतील 70 वर्षीय वृद्धेला दोघा भामट्यांनी लुबाडल्याची घटना

दुसरे मंदिर दाखवण्याचे प्रलोभन दाखवून बोलण्यात गुंतवत कोपरीतील 70 वर्षीय वृद्धेला दोघा भामट्यांनी लुबाडल्याची घटना कोपरीतील नातू परांजपे कॉलनीत घडली. वनिता चाळके या वृध्द महिलेकडून भामट्यांनी सहा तोळ्यांचे दागिने आणि रोख दहा हजार असा दीड लाखांचा ऐवज घेवून पोबारा केला आहे. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे पूर्वेकडे राहणाऱ्या वनिता चाळके सिद्धीविनायक मंदीरात गेल्या होत्या. तिथे देवदर्शन झाल्यानंतर घरी परतत असताना त्याच परिसरातील दिप्ती बिल्डींगजवळ भामट्याने त्यांना दुसरे मंदिर दाखवतो असे सांगून पुढे नेले. दोन बिल्डींगच्या मोकळ्या जागेत असलेल्या एका सिमेंटच्या पाईपवर बसण्यास सांगून तो तेथून निघून गेला. त्याच दरम्यान त्याच्या दुसऱ्या साथीदाराने बोलण्यात गुंतवून चाळके यांच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि हातातील पाटल्या पिशवीत ठेवण्यास सांगून त्यांच्याकडील दागिन्यासह रोख दहा हजार रुपये आणि तिजोरीच्या दोन चाव्या असा १ लाख 30 हजारांचा ऐवज घेवून पोबारा केला.

Leave a Comment

%d bloggers like this: