कल्याणकरांना विरंगुळा ठरणा-या सीटी पार्कचे भूमीपूजन

कल्याणमध्ये कल्याणकरांना विरंगुळा ठरणा-या सीटी पार्कचे भूमीपूजन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्याचप्रमाणे अंबरनाथ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शूटींग रेंज, मच्छी मार्केट, सेल्फी पॉईंट, बहुउद्देशीय सभागृह, व्यायामशाळा अशा विकासकामांचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. राज्यामध्ये १० मीटरचीच शूटींग रेंज उपलब्ध आहेत. जागतिक शूटींग स्पर्धेत भाग घेणा-या खेळाडूंना आवश्यक असलेली २५ आणि ५० मीटरची शूटींग रेंज फक्त मुंबईतच आहे. त्यामुळं ग्रामीण भागातील खेळाडूंना सरावासाठी मुंबईला जावं लागत होतं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंची ही अडचण ओळखून अंबरनाथ शहरामध्ये जागतिक दर्जाचे शूटींग रेंज व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. विम्को नाका अंबरनाथ येथे नगर परिषदेच्या सुमारे सव्वा एकर जागेवर १०, २५ आणि ५० मीटरचे शूटींग रेंज आकाराला आले असून यासाठी अडीच कोटींचा खर्च आला आहे. खासदार, आमदार आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत वचननाम्यात उल्लेख असलेल्या सिटी पार्कचं भूमीपूजनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. ३० एकरावरील हा प्रकल्प दोन टप्प्यात साकारणार असून पहिल्या टप्प्यासाठी ६४ कोटींचा खर्च येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading