कंत्राटी कर्मचा-यांना वेतन फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याची नरेश म्हस्के यांची मागणी

ठाणे महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांना फेब्रुवारी २०१५ ते डिसेंबर २०१६ पर्यंतच्या वेतन फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी तातडीनं द्यावी अशी मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांकडे केली आहे. राज्य शासनाने कंत्राटी कामगारांसाठी २४ फेब्रुवारी २०१५ मध्ये किमान मूळ वेतन दर निश्चित केले आहेत. या कर्मचा-यांना महापालिकेतर्फे वेतन दिलं जातं. मात्र फेब्रुवारी २०१५ ते डिसेंबर २०१६ या कालावधीचा वेतनाचा फरक देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये नाराजी आहे. काही दिवसांवरच दिवाळी आली असून दिवाळी पूर्वी कंत्राटी कामगारांना वेतनातील फरक मिळाल्यास त्यांची दिवाळी आनंदात साजरी होऊ शकते. यासाठी तातडीनं वेतन फरकाची रक्कम दिली जावी अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: