ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील औषध विक्रेत्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणा-या ऑनलाईन औषध विक्रीला प्रतिबंधित करून देखील ठाण्यात ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील शेकडो औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, रूग्णांच्या जिविताचं रक्षण करा अशी घोषणाबाजी करून आपल्या मागण्यांचं एक निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आलं. ऑनलाईन औषध विक्री सुरूच असल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर आंदोलन छेडण्यात आलं होतं. याचाच एक भाग म्हणून काल जिल्हा केमिस्ट असोसिएशननं जिल्हाधिकारी आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा आणणारी ऑनलाईन औषध विक्री रूग्णाच्या जीवावर बेतू शकते, ऑनलाईन औषध विक्रीमुळे एक पिढी बरबाद होण्याची भीती जिल्हाधिका-यांकडे व्यक्त केली. जिल्हाधिका-यांनी आंदोलकांच्या भावना राज्य आणि केंद्र शासनापर्यंत पोहचवण्यात येतील असं आश्वासन दिलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading