उल्हासनगर येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्विकासाचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन

उल्हासनगर येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्विकासाचं भूमीपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. या पुनर्विकासासाठी सव्वाशे कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. रेल्वे सेवा गतीमान करण्यासाठी आणि रेल्वे अपघात टाळण्यासाठी दिवा येथील रेल्वे उड्डाणपूलाचं भूमीपूजनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात विकसित करण्यात आलेली क्रिकेट खेळपट्टी आणि कल्याण पूर्वेत बांधण्यात आलेल्या दोन वाचनालयांचं लोकार्पणही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. उल्हासनगर येथे कामगार रूग्णालयाची इमारत आणि १२ निवासी इमारती असे मोठे संकुल असून या सर्वांचा आता पुनर्विकास होणार आहे. जुन्या रूग्णालयाच्या जागी १०० खाटांचं अद्ययावत सुसज्ज रूग्णालय होणार आहे. याचवेळी नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचं भूमीपूजनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं.

Leave a Comment

%d bloggers like this: