उन्नत भारत अभियानासाठी ठाणे जिल्ह्यातील ६ संस्थांची निवड

महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या उन्नत भारत अभियानासाठी जिल्ह्यातील ६ संस्थांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली असून त्यात जिल्ह्यातील ६ संस्थांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ४ तांत्रिक आणि २ अतांत्रिक संस्थांची निवड या अभियानासाठी झाली आहे. शहापूरमधील अलमुरी रत्नमाला इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, गोठेघर येथील विश्वात्मक ओम गुरूदेव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबईतील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आसनगांवमधील शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ठाण्यातील के. जी. जोशी कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स आणि गोवेलीतील जीवनदीप शैक्षणिक संस्था आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स अशा संस्थांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: