उक्ती फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीनं शहापूर तालुक्यातील विहीगावातील आदिवासी कुटुंबियांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं. दिवाळीच्या काळात शहरातील उच्चभ्रू वसाहतीमधून एक करंजी लाखमोलाची या उपक्रमाच्या माध्यमातून हा फराळ जमा करण्यात आला होता. ठाणेकरांनीही सढळ हस्ते आदिवासींकरिता विविध प्रकारचा फराळ आणि इतर वस्तू दान स्वरूपाने दिल्या. आदिवासींना आर्थिक दुर्बलतेमुळं शहरातील नागरिकांसारखे सण साजरे करणं कठीण असतं. घरात विविध प्रकारचे पदार्थ बनवणं शक्य होत नाही. शहरात मात्र याउलट परिस्थिती असते. उक्ती फौंडेशन या संस्थेनं आदिवासी आणि शहरातील नागरिकांमध्ये दुवा बनण्याचं काम केलं आहे. एक करंजी लाखमोलाची या उपक्रमातून जमा करण्यात आलेला फराळ गुरूवारी विहीगावातील आदिवासी कुटुंबियांना देण्यात आला. आदिवासी महिला, मुली आणि मुलांच्या आरोग्यासाठी लवकरच विशेष कार्यक्रम घेतला जाणार असल्याची माहिती उक्ती संस्थेच्या संचालिका गीतांजली लेले यांनी दिली.
