इफेड्रीन या अंमली पदार्थासह एका तरूणाला जांभळी नाका परिसरातून अटक

इफेड्रीन या अंमली पदार्थासह एका तरूणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहात अटक करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या अंकुश कसबे या तरूणाकडून ६ लाख २२ हजार रूपयांचे १५५ ग्रॅम इफेड्रीन ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती नौपाडा पोलीसांनी दिली. एक अज्ञात व्यक्ती ठाण्यातील गजबजलेल्या जांभळी नाका परिसरात अंमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मंगळवारी रात्री जांभळी नाक्याकडून टेंभीनाक्याकडे जाणा-या रस्त्यावर सापळा रचून अंकुश कसबे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे १५५ ग्रॅम इफेड्रीन आढळून आले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment