इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखनं आशियाई बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. ताश्कंद येथे झालेल्या स्पर्धेत १३ देशांचे २४६ खेळाडू सहभागी झाले होते. ठाण्याच्या नुबैरशाह शेखनं २० वर्षाखालील गटात सुवर्ण पदकावर देशाचे आणि आपले नाव कोरले. नुबैरशाह हा एम एच साबुसिद्दीक अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. नुबैरशाहचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे १७वे आंतरराष्ट्रीय पदक आहे.
