आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये ज्या शाळांमध्ये मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत त्या ठिकाणी दिव्यांगांना मतदान करणं सुकर आणि सोयीचं व्हावं यासाठी रॅम्पची व्यवस्था करणे, पुरेशी प्रकाश योजना करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करणे तसंच आवश्यक ते फर्निचर पुरवणे अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. या संदर्भात तातडीनं आवश्यक ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
