अवैध रेती उत्खननाविरोधात जिल्हा प्रशासनानं काल केलेल्या कारवाईत लाखो रूपयांची रेती आणि सामुग्री जप्त केली. मुंब्रा रेतीबंदर येथे महसुल विभागानं ही कारवाई केली. यावेळी अवैध रेती उत्खनन करणारे काही कर्मचारी पळून जाण्यात यशस्वी ठरले. महसुल विभागाच्या पथकानं टाकलेल्या छाप्यात मोठ्या बार्जेस आणि पंप लावलेल्या बोटी जप्त केल्या आहेत. जप्त केलेली ही सामुग्री महसुल विभागातर्फे नष्ट करण्यात आली. ही सामुग्री वापरून पुन्हा अवैध रेती उत्खनन होऊ नये म्हणून ही सामुग्री नष्ट करण्यात आली.
