अथर्वच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आणि सौख्य मढवीच्या झंझावती शतकामुळे सरस्वतीचा मोठा विजय

अथर्व कोशिरेड्डीचा अष्टपैलू खेळ आणि सौख्य मढवीच्या शतकी खेळीच्या जोरावर सरस्वती विद्यालयानं चंद्रकांत पाटकर विद्यालयाचा १९२ धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या १४ वर्षाखालील घंटाळी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी लढतीत स्थान मिळवले. सेंट्रल मैदानावर झालेल्या सामन्यात सरस्वती विद्यालयानं ५ बाद ३१० धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये सौख्यनं १९ चौकार आणि ३ षटकार ठोकत १३७ धावा केल्या. तर अथर्वनं गोलंदाजीतही छाप पाडत चंद्रकांत पाटकर विद्यालयाचा अर्धा संघ गारद केला. अथर्वनं ८ षटकांमध्ये २२ धावात ७ विकेट मिळवत संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading