गिरनार पर्वताच्या २०० हून अधिक पौर्णिमा वारी करणारे दत्तभक्त प्रमोद केणे यांचं दत्तमहाराजांच्या साक्षात्काराचे स्वानुभव ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. उद्या म्हणजे शनिवार १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता सहयोग मंदिरमध्ये ही अध्यात्मिक पर्वणी अनुभवता येणार आहे. जय गिरनार दत्तमंडळाच्या वतीनं भक्तांनी मोठ्या संख्येनं याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.