आदिवासी जनतेनं कुलदैवतेची पूजा करून साजरी केली दिवाळी

जिल्ह्यातील आदिवासी जनतेनं काल वसुबारसेच्या दिवशी कुलदैवतेची पूजा करून आपली दिवाळी साजरी केली. ठाणे जिल्हा हा मुख्यत्वे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी वस्ती आहे. आदिवासींची दिवाळी ही वसुबारसेपासून सुरू होते. जिल्ह्यामध्ये वारली, कोकणी, महादेव कोळी, मल्हार कोळी, कातकरी, ठाकर अशा विविध जमातीचे बांधव राहतात. जिल्हाधिकारी कार्यालयात तारपाधारी आदिवासीचा पुतळा आहे. हा पुतळा जिल्ह्यातील आदिवासी बांधवाची आठवण देत असतो. आदिवासी वारली समाजसेवा मंडळ, आदिवासी संघर्ष कृती समिती आणि संयुक्त आदिवासी उत्सव समितीतर्फे या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. या पुतळ्याची विधीवत पूजा करून आदिवासी बांधवांनी दिवाळीस सुरूवात केली. यावेळी काहीवेळ तारपा वादन करण्यात आलं. काही आदिवासी बांधवांनी पारंपरिक तारपा नृत्य केलं. त्यानंतर राघोजी भांगरे चौकात राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  तारपा नृत्य करण्यात आलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: