ठाणे परिवहन सेवेच्या तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता

मुंबई महापालिकेनं बेस्टच्या तिकिट दरात कपात केली असताना ठाणे महापालिकेनं मात्र परिवहन सेवेच्या तिकिट दरात पुन्हा एकदा वाढ प्रस्तावित केली आहे. ठाणे परिवहन प्रशासनानं आपलं अंदाजपत्रक सादर करताना तिकिट दरात २० टक्के भाडेवाढ प्रस्तावित केली होती. पण परिवहन समितीनं ही भाडेवाढ फेटाळली होती. त्यावेळी निवडणुका असल्यामुळं समितीनं भाडेवाढ फेटाळली होती. पण आता तिकिट दरवाढीचा प्रस्ताव पुन्हा सादर केला जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading