festival

दस-याच्या निमित्तानं ठाण्यात रावण दहन

दस-याच्या निमित्तानं काल ठाण्यात रावण दहन करण्यात आलं. साधारणत: उत्तर प्रदेशामध्ये रावण दहन करण्याची प्रथा आहे. आपल्याकडे मात्र अपवादात्मकरित्या रावण दहन पहायला मिळते. दुष्टप्रवृत्ती आणि वाईट विचारांवर विजय म्हणून रावण दहन केलं जातं. काल ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथे उमेद फौंडेशनच्या वतीनं हे रावण दहन करण्यात आलं. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते हे रावण दहन झालं.

Comment here