संविधान दिन आणि समता पर्वानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन  

संविधान निर्माते, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत समता पर्व साजरे करण्यात येत असून या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

            संविधान दिनानिमित्त आयोजित समता पर्वमध्ये जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने निर्देश दिले आहेत. यानुसार उद्या संविधानाचे वाचन होणार आहे. त्याशिवाय पुढील अकरा दिवस प्रभात फेरी, संविधानाचे वाचन, व्याख्याने व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, विविध स्पर्धा, कार्यशाळा, जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी, वृद्ध यांच्यासाठी योजनांची माहिती देणे, संविधानाबाबतचे सांस्कृतिक कार्यक्रम, लाभार्थ्यांना लाभाचे वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत.

जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृहे, दिव्यांग शाळा, निवासी शाळा यामध्येही भित्तीचित्र स्पर्धा, बॅनर, पोस्टर्स स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. इंगळे यांनी दिली.

Leave a Comment

%d bloggers like this: