जिल्ह्यात कोरोनाचे ५८ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ५८ नवे रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ३६७ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९६६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १२ रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या १५० रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १२ रूग्ण आढळले. सध्या २६ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६२ रूग्ण दगावले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २८ नवे रूग्ण आढळले. सध्या १३४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५६ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ३ रूग्ण आढळले. सध्या १३ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज २ रूग्ण आढळले. सध्या ११ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६६६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, सध्या ८ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण तर १४ रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये १ रूग्ण आढळला. सध्या ११ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: