5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी 28 मे रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार 28 मे रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे यासाठी राज्यात सन 1995 पासून उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दरवर्षी राबविण्यात येते.

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये सदर लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तरी पालकांनी 0 ते 5  वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करुन घ्यावे  असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading