शेअर बाजारात पैसे गुंतवा आणि उत्तम लाभ मिळवा असा प्रलोभन दाखवत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

शेअर बाजारात पैसे गुंतवा आणि उत्तम लाभ मिळवा असा प्रलोभन दाखवत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. दोघांनी पनास हूनअधिक लोकांची फसवणूक केली असून यामध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी याप्रकरणी अरविंद चौहान आणि तपेश शर्मा अशा दोघांना ईंदोंर येथून अटक केली आहे. चव्हाण हा अभियंता असून शर्मा हा एमबीए असल्याचं सांगितलं जातं. हे दोघ इंदोर मधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. हे दोघे वेगवेगळ्या सिम कार्ड वरून संपर्क साधत असत.शेअर बाजारात पैसे गुंतवा आणि त्यातून नफा कमवा असं प्रलोभन दाखवत अणि डिमॅट खाते उघडण्या साठी प्रवृत्त करत. त्यांच्या प्रलोभनाला भुलून अनेकांनी अशी खाती उघडली होती. या खात्यातील रक्कम ते स्वतःसाठी खर्च करत होते. कळव्यातील सुहास नेवासकर यांनी दोन लाखाहून अधिक रक्कम गुंतवली होती. पण नंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी कळवा पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी इंदूर येथून मधून या दोघांना अटक केली.तसेच या कॉल सेंटरमधील हार्डडिस्क, मोबाईल फोन जप्त केले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading