मेट्रोचं काम करताना ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळं काही भागाचा पाणी पुरवठा दुरूस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत ठप्प

एकीकडे जोरदार पाऊस असतानाच दुसरीकडे माजिवडा येथे एक जलवाहिनी फुटल्यामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. माजिवडा नाका परिसरात मेट्रोचं काम सुरू असून हे मेट्रोचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून जलवाहिनी फुटली. यामुळं मोठ्या प्रमाणावर पाणी वाहण्यास सुरूवात झाली. पावसाचं पाणी कमी असताना जलवाहिनी फुटल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत होतं. ६०० मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी असून मेट्रोच्या कामासाठी जमीन खणली जात असताना ही जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यानंतर काही काळानं पाणी पुरवठा बंद करण्यात आला. महापालिकेनं त्वरीत धाव घेऊन ही फुटलेली जलवाहिनी दुरूस्त करण्याचं काम हाती घेतलं आहे. मात्र यामुळं आज संध्याकाळपर्यंत वसंतविहार, सिध्दांचल, गावंड बाग, शिवाईनगर, गांधीनगर या भागाचा पाणी पुरवठा ही जलवाहिनी दुरूस्त होईपर्यंत बंद राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading