मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नगरसेवक देणार एक महिन्याचे मानधन

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरीप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शासनाच्या वतीने करण्यातयेणाऱ्या उपाययोजनांसाठी हातभार लावावा यासाठी ठाणे महापालिकेच्यासर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमाकरण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असून तसे पत्र महापौर नरेश म्हस्केयांनी महापालिका आयुक्तविजय सिंघल यांनादिले आहे.

          संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव होत असून गेल्या काही दिवसात आपल्याराज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरतातडीने उपचार करुन त्यांचे जीव वाचावे यासाठी शासनाच्यावतीने कठोर पावलेउचलून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातूनकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आपला सहभाग असावा यासाठी सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यामध्ये ठाणे महापालिकेतीलनगरसेवकांनी खारीचा वाटा उचलत आपले एक महिन्यांचे संपूर्ण मानधन देण्याचीमागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading