माजिवडा पूलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया

माजिवडा पूलाजवळ मेट्रो पूलाच्या पाईपिंगचं काम चालू असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या जलवाहिनीला धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली आहे. ज्युपिटर रूग्णालयाजवळ मेट्रोचं काम सुरू असताना प्राधिकरणाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटला आणि या जलवाहिनीतून कारंजाप्रमाणे  लाखो लिटर पाणी वाहू लागलं. महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि प्राधिकरणाच्या अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया जात असून वागळे इस्टेटमधील ६०० ते ६५० ग्राहकांचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी साधारणत: २ तासांचा अवधी लागेल त्यानंतरच वागळे इस्टेट येथील ग्राहकांचा पाणी पुरवठा सुरू होईल असं महापालिकेनं कळवलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading