पामतेलाची भेसळ करून पनीर उत्पादन करणा-या व्यावसायिकांवर कारवाई

पामतेलाची भेसळ करून पनीर उत्पादन करणा-या व्यावसायिकांवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे. विना परवाना पनीर उत्पादनाचा व्यवसाय करणा-या उपवन येथील शिवम डेअरी फार्मवर छापा मारून पनीरसह ॲसेटिक ॲसिड, पामोलीन तेल, मिल्क पावडर, स्कीम्ड मिल्क जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये १ लाख ६१ हजाराहून अधिक किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या साठ्यापैकी पनीर आणि दूध हे नाशवंत असल्यामुळं जमिनीत गाडून नष्ट करण्यात आलं. व्यापक जनहितासाठी पुढील आदेशापर्यंत उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading