दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र ठेवण्याची किरण नाकती यांची मागणी

दिव्यांगांच्या लसीकरणासाठी आदित्य प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण ड्राईव्ह इन स्वरूपात अन्यथा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तळमजल्यावर एखादे लसीकरण केंद्र राखीव ठेवावे अशी मागणी आदित्य प्रतिष्ठान दिव्यांग कला केंद्राचे अध्यक्ष किरण नाकती यांनी महापौरांकडे केली आहे. महापौरांनीही या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला असून महापालिका आयुक्तांकडे त्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाचा प्रश्न निकालात निघणार आहे. आदित्य प्रतिष्ठान गेली 14 वर्षे सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. तसेच वुई आर फॉर युच्या माध्यमातून कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिक तसंच कोरोना रुग्णांना विविध सेवा देण्याचं काम करत आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून ठाणे महापालिकेचा दिव्यांग कला महोत्सवही आयोजित केला आहे. शहरात करोना लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. त्यात दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्रपणे लसीकरण केंद्र उपलब्ध झाल्यास दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने लस देणे सहज शक्य होईल. आता महापालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading