ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांना खाजगी व्यवसाय करत असल्यामुळं निलंबित करण्याची मागणी

ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर शासकीय सेवेत असतानाही खाजगी व्यवसाय करत असल्यामुळं त्यांचं निलंबन करावं अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्या खांद्यावर ठाणे शहरचे सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी आहे, पण आपल्या पदाचा गैरउपयोग करत ते खाजगी व्यवसायही करत आहेत. डॉ. मुरुडकर ठाणे महापालिकेत नोकरीस असूनही चार खासगी रुग्णालये चालवित असल्याचं शेख यांचं म्हणणं आहे. परवानगीशिवाय खाजगी व्यवसाय किंवा नोकरी केल्यास, तर ती व्यक्ती दोषी ठरते. त्यानुसार डॉ. मुरुडकर यांना निलंबित करण्याची मागणी शकील अहमद शेख यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading