ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक – महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढविण्याचे ठरविले आहे. या निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 15 जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे रविवारी जाहीर केली.
मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी आज अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील आणि बाबूराव दिघा तर शिवसेनेचे अमित घोडा हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित पंधरा जागांसाठी महाविकास आघाडीकडून पंडीत पाटील (भिवंडी), सुधीर पाटील (कल्याण) , सुभाष पवार (मुरबाड), मधुकर पाटील ( पालघर), प्रकाश वरकुटे (शहापूर) , सुनील पाटील (विक्रमगड), किरण सावंत (वाडा) , लाडक्या खरपडे (तलासरी) , काँग्रेस (हौसिंग मजुर संस्था) , हणमंत जगदाळे (पतसंस्था), निलेश सांबरे (ओबीसी) , अनिल शिंदे (अ.जा/ज), विशाखा खताळ (व्हीजेएनटी ) , प्राजक्ता पानसरे आणि शोभा म्हात्रे (महिला प्रतिनिधी दोन जागा) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी येत्या 30 मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी 26 ते 4 मार्च दरम्यान अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 5 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून 21 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तर 30 मार्च रोजी मतदान आणि 31 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीमध्ये कृषी-पतसंस्थांमधून 14, पगारदार पतसंस्थांमधून 1, खरेदी-विक्री संघातून 1, महिला राखीव 2, अनु.जाती-जमातींसाठी 1 आणि ओबीसींसाठी 1 जागा राखीव आहे. 3 हजार 68 मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading