ठाणेकरांनी अलीकडेच प्राच्य विद्या अभ्यास संस्थेत शिल्प, चित्र आणि वाद्य असा त्रिवेणी कलाविष्कार अनुभवला

ठाणेकरांनी अलीकडेच प्राच्य विद्या अभ्यास संस्थेत शिल्प, चित्र आणि वाद्य असा त्रिवेणी कलाविष्कार अनुभवला. ज्येष्ठ शिल्पकार सिद्धार्थ साठे, ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर आणि व्हायोलीन वादक मोहन पेंडसे यांनी एकाच वेळेला आपल्या कला सादर केल्या. हा कार्यक्रम म्हणजे शिल्पकला, चित्रकला आणि वाद्यकलेविषयीचा त्रिवेणी संगम होता. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांचे मूर्तीशिल्प प्रत्यक्ष बनवत असताना त्यांचे चित्र देखील रेखाटले जात होते या दोन्ही कलांचे सादरीकरण होत असताना रसिकांना व्हायोलिन चे सुरेल संगीत ऐकण्याची संधी याप्रसंगी मिळाली. संस्थेच्या वतीने नेहमीच वेगवेगळे चित्रकला प्रदर्शन पुस्तक प्रदर्शन कलासंगम इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त डॉ महेश बेडेकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर याप्रसंगी मनोगत मांडताना म्हणाले की आज विद्यार्थ्यांना लहानपणीच चित्रकलेचे बाळकडू पाजण्याची गरज आहे शाळांमधून चित्रकला हा विषय जवळपास हद्दपार झाला आहे यासाठी शासनाला विनंती करून स्वाक्षरी मोहीम हाती घेतली पाहिजे असे बोधनकर यांनी सांगीतले. ज्येष्ठ शिल्पकार सिद्धार्थ साठे यांनी मूर्तिकला या विषयाची सांगोपांग उकल केली. मूर्तीवर भावनांच्या छटा काढताना श्रोत्यांना ते प्रत्यक्ष पाहण्याचा अनोखा आनंद घेता आला. याप्रसंगी ठाण्यातील रसिकांनी गर्दी केली होती. डॉ महेश बेडेकर यांनी मे महिन्यामध्ये संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या दुर्ग अभ्यास वर्गाची देखील माहिती दिली. संस्थेच्या नवनवीन उपक्रमांना ठाणेकरांनी आवर्जून प्रतिसाद द्यावा असे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांनी आवाहन केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading