जी पी पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन जयराम पाटील यांचे निधन

जी पी पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि संचालक जयराम पाटील यांचे कोरोनाने एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. जयराम पाटील हे खारीगाव मधील पहिले मॅट्रिक पास होते. कळवे ग्रामपंचायतीचे ते ११ वर्ष उपसरपंच होते. जी पी पारसिक बँकेच्या स्थापने पासून ते आतापर्यंत संचालक राहिले आहेत. जयभारत स्पोर्ट्स क्लबचे ते संस्थापक होते. दशरथ पाटील आणि नगरसेवक उमेश पाटील यांचे ते जेष्ठ बंधू आहेत. प्रसिद्ध व्यावसायिक जगदीश पाटील, संदीप पाटील यांचे ते वडील आहेत. त्यांच्या निधनाने कळवा, खारेगावमध्ये शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading