जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचं आयोजन

जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत ठाणे ग्रामिण भागातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापुर तालुक्यात तसेच बदलापुर आणि अंबरनाथ नगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतर्गत १ ते १९ वर्ष वयोगटातील शालेय आणि शालाबाह्य अशा साधारण २ लाख ५२ हजार ८२७ मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येणार आहे. एक ते दोन वयोगटातील बालकांना अर्धी गोळी तर दोन वर्षावरील मुलांना एक गोळी चावुन, पावडर पाण्यात विरघळवून खायची आहे. या मोहिमेचा उद्देश मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावणे असा असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. शालेय मुला-मुलींना २९ एप्रिल रोजी गोळ्या देण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित सर्व शाळाबाहय मुला-मुलींना आशा आणि अंगणवाडी कार्यकर्ती मार्फत २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading