कोरोनावरील रेमडेसिविर मिळणार १२०० रुपयात

कोरोनाची दुसरी लाट घोंघावत असताना कोविड रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केला आहे. कोविडवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर या महागडया इंजेक्शनच्या अव्वाच्या सव्वा किंमती कमी करून १२०० अथवा त्यापेक्षा कमी दरात हे औषध उपलब्ध करण्याचे निर्देश एफडीएचे कोकण विभागाचे सहआयूक्त वि.तु.पौनिकर यांनी दिले. जिल्हयातील कोविड रुग्णालये आणि त्यांच्याशी सलग्न औषध विक्रेते यांची आज बैठक झाली. त्यावेळी पौनिकर यांनी कोविड उपचारावरील औषधांचा आढावा घेतला. कोविड लसीकरण सुरू असले तरी, ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यातच कोविड आजारावरील उपचारात प्रभावी ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे सहा डोस घेणे फार खर्चिक ठरत होते. रेमडेसिविरचे उत्पादन मोजक्याच कंपन्या करीत असल्याने ३ ते ४ हजार अशा वेगवेगळ्या किमतीमध्ये किंवा प्रसंगी काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये खरेदी करावे लागत होते. ही अडचण ओळखुन पौनिकर यांनी एक बैठक घेतली.तसेच रेमडेसिविर औषध माफक दरात उपलब्ध करण्याविषयी चर्चा करून रेमडेसिविरचे १०० मि.ग्रॅमचे प्रती व्हायल इंजेक्शन १२०० किंवा त्यापेक्षा कमी दराने उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. ज्युपिटर हॉस्पिटल, बेथनी हॉस्पिटल, अॅव्हन्यु हॉस्पिटल, वसईचे कार्डिनल ग्रेसिअस हॉस्पिटल, नालासोपारा येथील रिध्दीविनायक मल्टीस्पेशालिट हॉस्पिटल,भिवंडीतील सिराज हॉस्पिटल,काझी हॉस्पिटल,अल मोईन हॉस्पिटल, कल्याणमधील आयुष हॉस्पिटल, साई क्रिटिकेअर हॉस्पिटल, उल्हासनगर, रिलायन्स हॉस्पिटल, कोपरखैरणे, नवीमुंबई, एम.व्ही.सी. केमिस्ट,ऐरोली, शिल्पा मेडीकल,कळंबोली,सुखम हॉस्पिटल,पनवेल या ठिकाणी रेमडेसिविर औषध १२०० रुपये अथवा यापेक्षा कमी दराने उपलब्ध करण्यात आल्याचे पौनिकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading