कॅप संस्थेनं मुक्या प्राण्यांबरोबर साजरा केला व्हॅलेन्टाईन डे

रस्त्यावर सोडलेल्या किंवा जखमी अवस्थेतील प्राण्यांवर उपचार करून त्यांना निवारा देणा-या कॅप संस्थेनं व्हॅलेन्टाईन डे आपल्या आवडत्या प्राण्यांबरोबर साजरा केला. वाघबीळ येथील प्रशस्त जागेमध्ये प्राण्यांसाठी फ्रीडम फार्म येथे निवारा केंद्र उभारलं जात असून व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्तानं प्राणी मित्रांनी येथील प्राण्यांची भेट घेऊन काही काळ त्यांच्यासोबत घालवून मुक्या प्राण्यांप्रती आपले प्रेम व्यक्त करत व्हॅलेन्टाईन डे साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचे सर्व उपाय योजून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास ५० हून अधिक प्राणीमित्रांनी प्राण्यांसोबत वेळ घालवत व्हॅलेन्टाईन डे साजरा केला. यावेळी त्यांनी प्राण्यांना खाऊ घातले. त्यांच्याबरोबर खेळ खेळले, फोटोही काढले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading