होळी, रंगपंचमीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश

होळी, रंगपंचमीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.सार्वजनिक ठिकाणातील झाडे आणी लाकडे तोडण्यास ,जाळण्यास,दहन करण्यास मनाई,रंगीत पाणी, रंग किंवा पदचाऱ्यांवर पावडर फेकणे अथवा उडविण्यास प्रयत्न करणे, आरोग्यास उपायकारक होईल असे रासायनिक रंगाचा वापर करणे, रंगाचे फुगे, पाण्याचे फुगे अथवा इतर द्रव पदार्थाचे फुगे बनविणे अथवा प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करुन फेकल्यास आरोग्य आणि जीवास धोका निर्माण होईल,सार्वजनिक जागेत अश्लील शब्द उच्चारणे, हावभाव,घोषणा देणे,अश्लील गाणी गाणे, वाकुल्या आणी विडंबनचे प्रदर्शन करणे भरविणे किंवा एखादयाची प्रतिष्ठा, योग्यता आणी नैतिकतेला धक्का पोहचेल असे प्रकारे लोकांना त्रास, अडथळा,दुखापत,जिवीतास धोका,आरोग्यास धोका अथवा सार्वजनिक शांततेस बाधा अथवा दंगा मारामारी होवू नये म्हणून हा मनाई आदेश आहे. या काळात शस्त्रे बाळगणे, जमाव जमविणे यास मनाई करण्यात आली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: