होळीच्या सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची जादा बसेसची सोय

यंदा होळीच्या सणाला कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमानी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त जादा बसेसची सोय केली असून, १७ मार्च ते २४ मार्च पर्यंत ही जादा वाहतूक मुंबई आणि कोकणातील विविध बसस्थानकातून करण्यात येणार आहे. १०वी, १२वी च्या परिक्षा या काळात संपत असल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा होळीच्या सणाला गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून महामंडळाने त्यानुसार जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. २० मार्चला होळीचा सण आहे. कोकणवासीयांना गणपती उत्सवानंतर होळीच्या सणाची प्रचंड उत्सुकता असते. मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना दरवर्षी प्रमाणे सुरक्षितरित्या थेट त्यांच्या दारापर्यंत घेऊन जाण्यासाठी एसटी सज्ज झाली असून,१७ मार्च पासून मुंबई सेंट्रल,परळ, कुर्ला नेहरूनगर या बसस्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त १००% ग्रुप बुकिंगच्या बसेस,प्रवांशांच्या सोयीसाठी त्यांच्या इच्छित स्थळापासून देण्यात येत आहेत. तथापि, आरक्षणाच्या बसेस या नियोजित बसस्थानकातून सुटतील. या सर्व बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून public.msrtcorg.com या संकेतस्थळावरून तसेच MSRTC MOBILE RESERVATION अँप द्वारे प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित करता येतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading