स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी निमित्त आदरांजली

देशासाठी असीम त्याग करणारे आणि देशासाठी आयुष्यभर हालअपेष्टा भोगणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. गडकरी रंगायतन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना सावरकर प्रेमींनी आदरांजली वाहिली. महापालिकेच्या वतीनंही महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

Leave a Comment

%d bloggers like this: