समान काम समान वेतन प्रकरणी ठाणे महापालिकेला खुलासा करण्याचे आदेश

समान काम समान वेतन प्रकरणी नगरविकास विभागानं ठाणे महापालिकेला खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत २०१३ मध्ये समान काम समान वेतन देण्याबाबतचा ठराव मंजूर झाला होता मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर समान काम समान वेतन हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असतानाच अचानक प्रशासनानं लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना हा ठराव विखंडीत करण्यासाठी पत्र लिहिले होते. याबाबत श्रमिक जनता संघ या संघटनेनं त्यास आक्षेप घेऊन प्रशासनाचे दावे असे खोटे आहेत हे निदर्शनास आणलं होतं. यावर नगरविकास विभागानं महापालिकेला आपला अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: