संगीतभूषण पंडीत राम मराठे संगीत महोत्सव  पुढे ढकलला – हा महोत्सव डिसेंबर महिन्यात

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने गेली 25 वर्षे संगीतभूषण पंडीत राम मराठे संगीत समारोहाचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा महोत्सव दिनांक 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2018 या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता परंतु काही अपरिहार्य कारणामुळे हा महोत्सव  पुढे ढकलण्यात आला असून हा महोत्सव डिसेंबर महिन्यात होईल याची सर्व संगीतप्रेमी रसिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन ठाणे महानगरपालिका आणिअखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

       पंडीत राम मराठे संगीत समारोहाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या समारोहात दरवर्षी शास्त्रीय संगीत क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कलावंताना संगीतभूषण पंडीत राम मराठे राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार व संगीतभूषण पंडीत राम मराठे राज्यस्तरीय स्मृती युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाही या पुरस्कारांनी मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. परंतु हा महोत्सव  काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला असून लवकरच याबाबतची तारीख जाहिर करण्यात येईल असे ठाणे महापालिकेच्यावतीने कळविण्यात आले असून सर्व संगीतीप्रेमीनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.         

Leave a Comment

%d bloggers like this: